साउथमधील सुपरस्टार अभिनेता यश याच्या “केजीएफ ः चॅप्टर 1′ चित्रपटाने प्रक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 250 कोटींचा गल्ला कमविला होता. हा चित्रपट गतवर्षी डिसेंबरमध्ये तमिळ, तेलुगु, मलयालम आणि हिंदीत प्रदर्शित झाला होता. हा कन्नड चित्रपटसृष्टीतील आतापर्यतचा सर्वाधिक हिट चित्रपटांपैकी एक ठरला होता.
आता “केजीएफ’चा सीक्वल काढण्यसाठी चित्रपट निर्मात्यांनी पूर्ण तयारी केली आहे. या चित्रपटात संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक संजय दत्तने ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. यापूर्वी संजय दत्तने चित्रपटातील आपला पहिला लुकही शेअर केला होता.
Rebuilding an empire won’t be that easy… Here’s the #KGFChapter2FirstLook
featuring @TheNameIsYash.@VKiragandur @Karthik1423 @Prashanth_neel @hombalefilms pic.twitter.com/FABEr2gkwx— Sanjay Dutt (@duttsanjay) December 21, 2019
या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये यश हा ब्ल्यू शर्ट आणि ब्लॅक पॅटमध्ये दिसत असून तो काही कामगारांसोबत कोणती तरी वस्तु ओढताना दिसतोय. संजय दत्तने पोस्टर शेअर करत म्हटले आहे की, अंपायरला पुन्हा स्थापित करणे सोपे नसते. “केजीएफ – चॅप्टर 2’चा पहिला लुक.
दरम्यान, या चित्रपटात संजय दत्त अधिराची भूमिका साकारत आहे. तर यश आणि श्रीनिधी शेट्टी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. मात्र, याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.