Lal Salaam: सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात कपिल देव यांचाही एक कॅमिओ आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने केले आहे. हे एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटात रजनीकांत मुस्लिम गँग लीडरच्या भूमिकेत आहे. धार्मिक सलोखा आणि जातीयवाद यांसारखे मुद्देही चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. ‘लाल सलाम’ च्या ट्रेलरची सुरुवात लोक घनदाट जंगलात कोणालातरी शोधत आहेत. त्यानंतर एका कारजवळ बॉम्बचा स्फोट होतो. पुढच्या सीनमध्ये विष्णूसह अनेक लोक क्रिकेट खेळताना दिसत आहेत. यानंतर हत्याकांड, जाळपोळ, दंगली पाहायला मिळतात.
रजनीकांत यांनी या चित्रपटात मोईदीन भाईची भूमिका साकारली आहे. यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची झलक दिसत आहे.ते क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंना प्रशिक्षण देताना दिसत आहे आणि एका दृश्यात रजनीकांतसोबत बसून सामना पाहत आहे.
‘लाल सलाम’च्या ट्रेलरमध्ये रजनीकांतचा ॲक्शन अवतार पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार आहे. ‘लाल सलाम’ 9 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पार्श्वसंगीत अप्रतिम असून ए आर रहमानने यांनी संगीत दिले आहे.