मुंबई – रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘जेलर’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी ऑडिओ रिलीज प्रोग्रॅम मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमासाठी सुपरस्टार रजनीकांतने शानदार एन्ट्री केली. यावेळी उपस्थित हजारो चाहत्यांनी जल्लोष करत त्यांचे स्वागत केले. यादरम्यान सुपरस्टारने अनेक विषयांवर चर्चा केली. त्याचवेळी त्याने त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दलही सांगितले.
दारूची सवय नसती तर समाजाची सेवा अधिक प्रमाणात केली असती, असे अभिनेता यावेळी म्हणाला. दारूचे व्यसन ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. मी असे म्हणत नाही की ते पूर्णपणे टाळा असं मी म्हणत नाही परंतु नियमित मद्यपान करू नका. हे आरोग्य आणि आनंदासाठी चांगलं नाही यांची झळ तुमच्या कुटुंबियांना आणि जवळच्यांना बसते.
“जर दारूचं व्यसन मला जडलं नसतं तर मी समाजासाठी अधिक चांगलं काम करू शकलो असतो. दारू पिणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. माझ्या भावाने मला तेव्हा बजावलं होतं. दारू माझ्या आयुष्यात नसती तर मी आणखी चांगला माणूस आणि मोठा स्टार बनू शकलो असतो. असं रजनीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले.
रजनीकांत यांनी या वाईट सवयींबाबत बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारीमध्ये, चारुकेसी या तामिळ नाटकाच्या समारंभासाठी त्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, तेव्हा देखील अभिनेत्याने व्यसनाधीनतेबद्दल आणि त्या काळात त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या पत्नी लताचे आभार मानले होते.