राज्यातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी राजेश टोपेंचे ‘महत्वाचे’ विधान; म्हणाले…

मुंबई : राज्यात करोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. त्यातच आता ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण राज्यातही सापडले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या नव्या प्रकाराचे सध्या आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नव्या प्रकाराची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणी पॉझिटिव्ह नसल्याची दिलासादायक माहितीही यावेळी त्यांनी दिली. आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचं आपण सक्तीने पालन करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची ड्राय रन होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

राजेश टोपे यांनी यावेळी जनतेने जागरुक राहावे, घाबरण्याचे कारण नाही. चिंता करु नका पण काळजी घ्या असे आवाहन केले. “व्हायरसचा हा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य आहे. ७० टक्के अधिक झपाट्याने संसर्ग होऊ शकतो. काळजी घ्यावी, सजग राहावं इतकंच महत्वाचं आहे,” असं त्यांनी सांगितलं.

“राज्यात सध्या आठच रुग्ण असून त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरु आहे. त्यांच्या संपर्कातील कोणीही पॉझिटिव्ह आढळलेला नाही. कोणी पॉझिटिव्ह आढळला तरी करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालाय का हे आधी तपासावं लागेल,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.