मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेणार असल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे यांनी अनके सभांमधून भाजपविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवत नसले तरी भाजप विरोधात त्यांनी कंबर कसली आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या सभेमुळे मनसेचा मतदार भाजप – सेनेकडे येईल. मान न मान मै तेरा मेहमान अशी राज ठाकरेंची अवस्था. राज ठाकरेंच्या सभांनी काहीही परिणाम होणार नसून त्यांच्या सभांचा फायदा मोदींना होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ते समोर म्हणाले, राज ठाकरे ९ सभा घेणार आहेत, ते आमच्या विरोधात प्रचार करणार आहेत. मात्र त्यांची अवस्था दुर्दैवी आहे . राज ठाकरे यांच्यासोबत गेलेली मंडळी मनाने हिंदुत्त्ववादी आहेत. त्यामुळे त्यांचा उरलासुरला मतदारही त्यांना सोडून देणार आहे.