गुजरात लोकसभेबदल राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये स्वबळाची नारा देत लोकसभेच्या सर्वच्या सर्व २६ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता राष्ट्रवादीने गुजराजमध्ये सपशेल माघार घेत 26 पैकी केवळ 1 जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरातमधून पंचमहाल लोकसभा मतदारसंघातून विरेंद्र पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विरेंद्र पटेल हे एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गुजरातमध्ये लोकसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात असतील.

दरम्यान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला २९ जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे राष्टृवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर वाघेला हे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती, मात्र त्यांनीही माघार घेतली असल्याचे समजते आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.