मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केले.
आज (दि. 5) लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व 67 एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार आहे.