पुणे -ऐन भरात असलेल्या गुलाबी थंडीत आणि नवीन वर्ष स्वागताच्या तोंडावर राज्यात पुन्हा पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये 28
आणि 29 डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विभागाच्या माहितीनुसार, 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर तर 27 पासून मध्य भारतावर वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार होत आहे.