Railway Stock : सध्या शेअर बाजारात रेल्वेचा स्टाॅक सुसाट आहे. रेल विकास निगम, IRFC, IRCON च्या शेअर्समध्ये नेत्रदीपक वाढ झाली आहे. IRCON चा स्टॉक 15 टक्क्यांच्या उडीसह नवीन उच्चांकावर आहे. अर्थसंकल्पाकडून रेल्वे क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. सरकार या क्षेत्राला मोठा निधी देऊ शकते, असा विश्वास आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स वधारताना दिसत आहेत.
IRCON शेअर्स शनिवारी सकाळी 231.35 रुपयांच्या पातळीवर उघडले. पण काही काळानंतर तो 261.35 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. जानेवारी महिन्यातच या कंपनीच्या शेअर्सची किंमत 45 टक्क्यांनी वाढली आहे.
सहा महिन्यांत दुप्पट झाले पैसे –
गेल्या एका वर्षात IRCON च्या शेअरची किंमत 276 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, हा रेल्वेचा शेअर 50.15 (27 फेब्रुवारी) च्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून 421 टक्के वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमती 187 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
हे रेल्वेचे शेअर्स तेजीत –
IRCON व्यतिरिक्त, रेल्वे विकास निगमच्या शेअर्समध्ये आज 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 320.75 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. त्याच वेळी, IRFC शेअर्सची किंमत 9.7 टक्क्यांनी वाढली आहे. रेल टेल देखील आज नवीन उंचीवर आहे. कंपनीचे शेअर्स 417.80 रुपयांवर होते. IRCTC 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे.
(टीप – हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कृपया कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)