येत्या तीन वर्षात देश नक्षली समस्येपासून मुक्त होईल – अमित शहा
Updated On:

तेजपूर (आसाम) – येत्या तीन वर्षांत देश नक्षलवादाच्या संकटातून मुक्त होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. सलोनीबारी येथे सशस्त्र सीमा बलाच्या ६० व्या स्थापना दिनाला संबोधित करताना शहा यांनी हे प्रतिपादन केले.
सर्व केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये संस्कृती, इतिहास, भाषा यांचे सूक्ष्मपणे एकत्रीकरण करण्यात आणि सीमावर्ती भागातील लोकांना जवळ आणण्यात एसएसबी अद्वितीय भूमिका बजावते असे कौतुगोद्गारही त्यांनी काढले.
येत्या तीन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नक्षली समस्येपासून १०० टक्के मुक्त होईल, असे ते म्हणाले. यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते एका टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.





