पुणे – राज्यात रेल्वे प्रशासनाकडून सेवेला प्रारंभ झाला. नुकतेच मध्य रेल्वेने पाच आंतरराज्यीय रेल्वे गाड्यांची घोषणा केली.
या साखळीत रेल्वेसेवेचा विस्तार करत बुधवारी आणखी आठ गाड्या लवकरच धावणार असल्याची घोषणा मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे.
यामध्ये पुण्याहून नागपूर आणि अमरावतीला जाणाऱ्या रेल्वेचाही समावेश आहे. याशिवाय, मुंबईहून लातूर, कोल्हापूर, नांदेड आणि कोल्हापूर-गोंदिया या रेल्वेगाड्यांचाही समावेश आहे.
या सुपरफास्ट विशेष गाड्यांचे बुकींग 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आरक्षण केंद्र आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तिकीट आरक्षित होणार आहे. या गाड्यांमध्ये केवळ “कन्फर्म’ तिकीट असणाऱ्यांनाचा प्रवास करता येणार आहे.