पुणे – पीसीएमसी हॉकी अकादमी, मध्य रेल्वे पुणे आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आयोजित केलेल्या एम जे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेतील (पुरुष आणि महिला) आपापल्या पहिल्या गटातील सामन्यात विजय मिळवला आणि पूर्ण गुण मिळवले. धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
पीसीएमसी हॉकी अकादमीने साखळी अ गटामध्ये यजमान एक्सलन्सी हॉकी अकादमीचा ०-१ असा पिछाडीवरून ३-१ असा पराभव केला. पेनल्टी स्ट्रोकवर सौरभ पाटील (३५वा), पेनल्टी कॉर्नरवर जय काळे (३८वा) आणि अभिषेक माने (५७वा) यांचा प्रत्येकी एक गोल पीसीएमसीच्या विजयासाठी पुरेसा ठरला. एक्सलन्सी हॉकी अकादमीसाठी नवज्योत सिंग (सहावे मिनिट) पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करून संघाला आघाडी मिळवून दिली.
मध्य रेल्वे पुणेने सात खेळाडूंसह खेळणाऱ्या किड्स इलेव्हनचा १०-० असा पराभव करीत एकतर्फी विजयाची नोंद केली. रुबेन केदारी (१७ वे, २२ वे, ३७ वे) याने तीन, भूषण ढेरे (दुसरे,आठवे ) आणि अवधूत सोलनकर (सातवे, ३३वे) आणि विशाल पिल्ले (४७ वे, ५५वे) यांनी प्रत्येकी दोन गोल केले आणि विनोद निंभोरे (१९वे) यांनी गोल केले. साखळी क गटामध्ये क्रीडा प्रबोधिनीने फ्रेंड्स युनियनचा १०-१ असा धुव्वा उडविला.
IPL 2024 Auction : आयपीएल 2024 साठी 333 खेळाडूंचा होणार लिलाव अन् स्लॉट मात्र 77 च शिल्लक…
विजय संघाकडून प्रज्वल मोहरकर (८वे, ९वे, ३७वे, ४८वे) याने चार गोल केले. गोल करणाऱ्यांमध्ये राहुल शिंदे (२१वे, ३३वे), धैर्यशील जाधव (3रे), योगेश बोरकर (१३वे), रोहन पाटील (43वे) आणि सचिन राजगडे (५६वे) आहेत. फ्रेंड युनियनकडून रेहान शेख (२५वे) याने एकमेव गोल नोंदविला.