अलिबाग – रायगड जिल्ह्यात गेल्या जून महिन्यापासून आत्ता पर्यंत 2800 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्या जिल्ह्यातील एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत हे प्रमाण 89 टक्के इतके आहे.
गेल्या 24 तासांत अलिबागला 70 मिमी पावसाची नोंद झाली तर म्हसळा आणि माथेरानाला सुमारे 56 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कर्जत, पोलादपुर, मुरूड येथेही जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
मुरूड आणि श्रीवर्धन जिल्ह्यात आत्तापर्यंत पावसाने सरासरी ओलांडली असून मुरूडला सरासरीच्या 122 टक्के इतका पाऊस झाला आहे. रविवारी सकाळ पर्यंत या जिल्ह्याला अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात या जिल्ह्यात तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती तसेच अनेक ठिकाणी दरडीही कोसळण्याचे प्रकार घडले होते.