सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहर आणि तालुक्यातील पाच जुगार अड्ड्यांवर छापे टाकून, पोलिसांनी 11 जणांवर कारवाई केली. शहरातील मल्हार पेठेमधील भोसले गल्लीत मोहम्मद वजीरखान (रा. रविवार पेठ) हा जुगार घेताना आढळला. त्याच्याकडून सातशे रुपये जप्त करण्यात आले आहेत.
खेड फाट्यावरील वसंतनगर येथील छाप्यात नितीन बजरंग करे (रा. वाढे, ता. सातारा), हुसेन दिलावर कागदी (रा. काशीळ ता. सातारा), अमितकुमार विश्रांत माने रा. गिरेवाडी, ता. पाटण) आणि समीर कच्छी (रा. सातारा) यांच्यावर कारवाई करून, 2030 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
वसंतनगर येथेच संजय नामदेव घाडगे (रा. संगमनगर, सातारा), रवींद्र प्रकाश सोनवणे (रा. प्रतापसिंहनगर, खेड) आणि शाहरुख काझी (रा. कोरेगाव) यांच्यावर कारवाई करून, तीन हजार रुपये रोख आणि पाच हजार रुपयांचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. पानमळेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत जुगार घेणार्या दीपक नथुराम इंगवले (रा. किडगाव, ता. सातारा) याच्याकडून 890 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे चेतन ज्ञानेश्वर कुंभार (रा. महागाव, ता. सातारा) आणि चंद्रमणी धनंजय आगाणे (रा. कोडोली ता. सातारा) यांच्यावर कारवाई करून, बाराशे रुपये जप्त करण्यात आले आहेत.