Prathamesh Parab : अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) ‘टाइमपास’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटातील त्याच्या या चित्रपटातील दगडूची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. मात्र सध्या प्रथमेश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नव्या वर्षात प्रथमेश परब लवकरच गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. प्रथमेशच्या केळवणाला सुरूवात झाली असून त्याचे फोटो देखील समोर आले आहेत.
‘टाईमपास’ चित्रपटातील दगडू आणि प्राजूची लव्हस्टोरी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यानंतर आता तो खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत लग्नगाठ बांधणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेशने त्याच्या वाढदिवसानिमित्त रिअल लाइफमधील प्राजू मिळाली असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्याने गर्लफ्रेंडसोबत बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. तेव्हापासून लवकरच प्रथमेश लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. अखेर आता प्रथमेशच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे.
View this post on Instagram
प्रथमेशने इन्स्टाग्राम अकाऊंटवर केळवणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रथमेश आणि क्षितीजा केळवण करताना दिसत आहेत. प्रथमेश आणि क्षितीजाने केळवणाचा फोटो शेअर करत ‘#प्रतिजाचं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो.. (PS- तारीख खूपच Special आहे !, Hint caption मध्येच आहे. Comment मध्ये guess करा.) तोवर… नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Happppppy “2024”, असे कॅप्शन लिहीले आहे. प्रथमेश आणि क्षितीजाच्या पोस्टवरील कॅप्शन वाचून अनेकांनी ते 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र याबाबत त्याने स्पष्ट सांगितलेले नाही. दरम्यान, प्रथमेश परब होणारी पत्नी क्षीतिजा ही एक बायोटेक्नॉलॉजिस्ट असून ती फॅशन डिझायनिंग सुद्धा करते.