नवी दिल्ली – ज्येष्ठ क्रिकेटपटू व भारताच्या कनिष्ठ संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुन्हा मोठी जबाबदारी सोपविली आहे. बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षाकरिता त्यांच्याकडे ही जबाबदारी राहणार आहे.
द्रविड हे एक जुलै रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंना घडविण्याची त्यांच्याकडे जबाबदारी राहणार आहे. तसेच अकादमीतील अन्य प्रशिक्षक व बिभागीय अकादमीत प्रशिक्षक नियुक्त करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला आहे. महिला खेळाडूंना घडविण्याचे कार्यही त्यांच्याकडेच देण्यात आले आहे.