साना – येमेन मध्ये सौदी सरकार पुरस्कृत आघाडीने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये सात जण ठार झाले असून अन्य अनेक जण जखमी झाले आहेत. तैज प्रांतात करण्यात आलेल्या हल्ल्यांमधून अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. शुक्रवारी खादीर जिल्ह्यात झालेल्या हवाई हल्ल्यात एक महिला आणि चार मुले ठार झाली.
येमेनमध्ये कार्यरत असलेल्या इराण पुरस्कृत हौधी गनिमांना नेस्तानबूत करण्यासाठी सौदी अरेबियांने अन्य देशांच्या मदतीने आघाडी उघडली असून मार्च 2015 पासून त्यांनी येमेन मध्ये जमीनीवरून तसेच हवाई मार्गाने अनेक हल्ले केले आहेत. हौथी गनिमांचे बरेच अड्डे या हल्ल्यांमधून नष्ट करण्यात आले आहेत. या संघर्षात आत्तापर्यंत 91 हजार लोक ठार झाले असून लक्षावधी लोकांपुढे भूकेचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे.