मेलबर्न :– दुखापतीतून पूर्ण बरा झालेला स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल पुढील वर्षी जानेवारीत होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. नदालच्या पायाला झालेल्या दुखापतीतून तो बरा झाला आहे व त्याने सरावही सुरू केला आहे. त्याच्यासह जपानची नाओमी ओसाकाकॅरोलिना वांझीयांकी या महिला टेनिसपटूही दुखापतीतून सावरल्या असून त्या देखील या स्पर्धेत सहभाग घेतील.
ही स्पर्धा दर मोसमातील पहिलीच ग्रॅंडस्लॅम स्पर्धा असते त्यामुळे या स्पर्धेत सर्बियाच्या नोवाक जोकोवीचला त्याच्यासारख्याच दर्जेदार खेळाडूंशी मुकाबला करावा लागणार आहे. विशेषतः नदालचे पुनरागमन त्याच्यासाठी धोक्याचा इशारा ठरेल, असेही आयोजकांनी सांगितले. निक किर्गीयॉसही या स्पर्धेत खेळणार असून नदाल गतविजेतेपद कायम राखण्यासाठी सज्ज असेल. या खेळाडूंसह जोकोवीचसमोर कार्लोस अल्कारेझचेही आव्हान असेल.
दरम्यान, 2009 च्या अंतिम फेरीत रॉजर फेडररचा पराभव करून आणि 2022 मधील 21 व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदासाठी डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून नदालने ऑस्ट्रेलियन ओपन दोनदा जिंकले आहे.
जानेवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मॅकेन्झी मॅकडोनाल्डकडून दुसर्या फेरीत झालेल्या पराभवाच्या वेळी हिप स्नायूला दुखापत झाल्यामुळे 37 वर्षीय नदाल स्पर्धात्मक टेनिसपासून दूर आहे.नदालने तंदुरुस्त होण्यासाठी संपूर्ण हंगाम घेतला आणि घोषित केले की तो 2024 मध्ये परत येईल, जे त्याचे शक्यतो शेवटचे वर्ष असेल.