मुंबई – लोकांना आपल्या लग्नात फोटो काढण्याची खूप हौस असते. ते उत्स्फूर्तपणे पोझ देतात आणि हे फोटो नंतर आठवणींचा भाग बनतात. पण एक अभिनेत्री अशीही आहे जी तिच्या लग्नात फोटो काढायला विसरली आणि त्यामागील कारण समजल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. अभिनेत्रीने सांगितले की तिचे अर्ध्याहून अधिक मित्र लग्नाच्या पार्टीत फोटोग्राफर होते, परंतु तरीही तिच्या लग्नाचा एकही फोटो काढला गेला नाही. हे घडले कारण अभिनेत्री आणि तिचे मित्र पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होते आणि यामुळे ते लग्नाचे फोटो काढण्यास विसरले.
राधिकाकडे लग्नाचा फोटो नाही
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने नुकताच तिच्या लग्नाबाबत धक्कादायक खुलासा केला. लग्नाचे फोटो का नाहीत हे तिने सांगितले. जेव्हा मी 10 वर्षांपूर्वी बेनेडिक्टशी लग्न केलं तेव्हा आम्ही फोटो क्लिक करायला विसरलो होतो. आम्ही आमच्या लग्नासाठी मित्रांना आमंत्रित केलं होत. मिताच्या साथीने आम्ही लग्न केले आणि उत्तर इंग्लंडमधील एका ठिकाणी पार्टी केली, परंतु कोणतेही फोटो काढले नाहीत. आमचे निम्मे मित्र फोटोग्राफर असले तरी त्यांच्यापैकी कोणीही फोटो काढले नाहीत. राधिकाने पुढे सांगितले की, आम्ही सर्व खूप नशेत होतो. त्यामुळे माझ्या लग्नाचे कोणतेही फोटो माझ्याकडे नाही,त्यामुळे वाईट वाटत असल्याचे राधिका आपटे सांगते.
राधिका पतीसोबत राहत नाही
राधिका आपटे आपल्या पतीसोबत मुंबईत राहत नाही. राधिका तिच्या कामानिमित्त मुंबईत आहे आणि तिचा नवरा बेनेडिक्ट आपल्या व्यवसायामुळे पत्नीपासून सात समुद्र दूर लंडनमध्ये राहतो. तिच्या लांबच्या नातेसंबंधाबद्दल, राधिकाने सांगितले होते की तिचे वैयक्तिक जीवन खूप व्यस्त आहे, कारण तिला अनेकदा लंडन आणि भारत दरम्यान प्रवास करावा लागतो.
राधिका आपटे तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. आपल्या १७ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये राधिकाने ‘अंधाधुंद’ आणि ‘शोर इन द सिटी’ सारखे उत्तम चित्रपट केले आहेत. याशिवाय ती अनेक दर्जेदार वेब सीरिजमध्येही दिसली आहे. राधिकाला बोल्ड भूमिका करण्यात अजिबात संकोच वाटत नाही. राधिका नुकत्याच रिलीज झालेल्या ‘Zee5’ वेबसीरिज ‘Forensics’ मध्ये दिसली होती. यामध्ये राधिका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होती.