महाराणी एलिझाबेथ, युवराज फिलीप यांना करोनाविरोधी लस

लंडन – ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांचे पती युवराज फिलीप यांना आज करोना विरोधी लस देण्यात आली. बकिंगहॅम राजप्रासादाच्या सूत्रांनी ही माहिती आज दिली. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा देशपातळीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

यामुळे राजघराण्यातील सदस्य विंडसर राजप्रासादातच मुक्कामाला आहेत. येथेच महाराणी एलिझाबेथ अणि ड्युक ऑफ एडिनबर्ग यांना ही लस टोचण्यात आली, असे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये करोनाविरोधी लसीकरण मोहिमेला गेल्या आठवड्यातच सुरुवात करण्यात आली. या मोहिमेसाठी लस ज्यांना दिली जाणार आहे, त्यांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. 80 वर्षांवरील वय असलेले ज्येष्ठ नागरिक हे या लसीकरणासाठी प्राधान्याच्या क्रमवारीमध्ये आहेत. त्यानुसार महाराणी एलिझाबेथ (वय 94 वर्षे) आणि युवराज फिलीप (99 वर्षे) हे प्राधान्याच्या अग्रक्रमावर आहेत. ब्रिटनमधील करोना विरोधी लसीकरणाच्या मोहिमेंतर्गत 1 कोटी 50 लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे.

ब्रिटनमध्ये करोना विषाणूची नवी प्रजाती सापडल्यापासून करोनाचे रुग्ण सापडण्याचा वेग आणि प्रमाणही वाढले आहे. देशपतळीवरील हा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी पंतप्राधान बोरीस जॉन्सन यांनी कठोर उपाय योज्ना लागू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून ब्रिटनमध्ये नव्याने लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.