पुणे – गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पुन्हा एखदा संबोधीत केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलला म्हणजेच आज रात्री 9 वाजून 9 मिनिटांसाठी मेणबत्ती, मोबाईल फ्लॅश लाईट लावून सामुदायिक योगदानातील आपली कटिबद्धता व्यक्त करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
दरम्यान, ‘हँड सॅनिटायझर’ लावून दिवे किंवा मेणबत्ती पेटवणे तुम्हाला महागात पडू शकतं. कारण सॅनिटायझर हे अल्कोहोल मिश्रित असते. आणि अल्कोहोल हा ज्वलनशील पदार्थ आहे. दिवे लावताना त्याचे काही प्रमाण जर हातावर असेल तर ते पेटही घेऊ शकते. आणि त्यामुळे तुमचा हात भाजण्याची शक्यता ही अधिक असते.
अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझमुळे हातावरील कोरोनाचा विषाणू नष्ट होण्यास मदत होते. मात्र यामध्ये ‘आयसो प्रोपाईल अल्कोहल’, ‘इथेनॉल’ किंवा ‘एन-प्रोपेनॉल’चे 60 ते 90 टक्के मिश्रण असते. हे मिश्र उच्च ज्वलनशील पदार्थ आहेत.
रविवारी दिवे किंवा मेणबत्ती पेटविताना हाताला सॅनिटायझर लावू नका, त्यामुळे मोठा धोका होऊ शकतो. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या उपक्रमानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.