सासवड -येथील तहसील कार्यालयातील एका वाहनचालकाचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा वाहनचालक तहसीलदार यांच्या गाडीवर आहे. चालकास बाधा झाल्यानंतर तहसीलदार यांची करोना तपासणी केली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि: श्वास सोडला.
तहसीलदार यांच्या वाहनचालकास करोनाची बाधा झाल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून गेले होते. त्यात तहसीलदार यांचा वाहनचालकच बाधित आढळल्यामुळे स्वत: तहसीलदार यांनी करोनाची तपासणी केली. या अहवालाकडे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते.
मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. तहसीलदार ही माहिती देऊन महसूलच्या अधिकाऱ्यांना करोनाचा सामना धीराने करण्याचा सल्ला दिला.