हाणामारी प्रकरणी पंजाब पोलिस आणि पीएनबी संघाच्या हाॅकी खेळाडूचं निलंबन

नवी दिल्ली : नेहरू कप हाॅकी स्पर्धेच्या पंजाब पोलिस विरूध्द पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) या अंतिम लढतीत दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये हाणामारी झाली होती. यासंबंधीचा अहवाल हाॅकी इंडियाच्या शिस्त पालन समितीकडे सादर केला गेला आहे.

त्यानुसार हाॅकी इंडियाच्या अनुशासन समितीने पंजाब पोलिसाचे खेळाडू हरदीप सिंह आणि जसकरण सिंह यांना १८ महिन्यांपर्यत तर दुपिंदरदीप सिंग, जगमीत सिंह, सुखप्रित सिंह , सरनवजीत सिंह आणि बलविंदर सिंह यांना १२ महिन्यापर्यत निलंबित केले आहे. याच हे निलंबन ११ डिसेंबरपासून लागू होईल. ही कारवाई हाॅकी इंडिया/ हाॅकी लीग आचारसंहिता लेव्हल तीन चे उल्लंघन केल्यानंतर दोषी आढळल्यानंतर करण्यात आली आहे.

त्यानुसार ११ खेळाडू आणि दोन्ही संघाच्या अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे. पंजाब पोलिस संघाचे मॅनेजर अमित संधू यांना १८ महिन्यापर्यंत निलंबित केलं आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या सुखजीत सिंह, गुरसिमरन सिंह यांना १२ महिने तर कर्णधार जसबीर सिंह याला ६ महिने निलंबित केले आहे. पंजाब पोलिस संघास कोणत्याही अखिल भारतीय टूर्नामेंट मध्ये सहभागी होण्यापासून ( १० मार्च ते ९ जून २०२० ) चार महिने निलंबित करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.