पुणे – रत्नागिरी येथे २० आणि २१ जानेवारीरोजी झालेल्या ४४ व्या कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये पुणे शहराच्या मल्लांनी एक सुवर्ण, तीन रौप्य व तीन कांस्यपदके मिळवली. तसेच पुणे शहराला द्वितीय सांघिक विजेतेपद मिळाले.
त्याबद्दल कुस्तीगीर संघ पुणे शहराचे अध्यक्ष पै. अमोल बराटे, कुस्तीगीर संघ व सह्याद्री कुस्ती संकुलाचे संस्थापक-अध्यक्ष विजय काका बराटे, उपमहाराष्ट्र केसरी पै. सागर भाऊ गरुड, एनआयएस कुस्ती प्रशिक्षक संदिप पटारे, युवा नेते भारतभूषण बराटे पै. महेंद्र कुंजीर यांनी सर्व पैलवानांचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे व दत्ता पिसे प्रवीण कदम, अमोल कारले व अजय शेळीमकर यांनी हार्दिक अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पुण्याचे विजयी मल्ल –
६५ किलो तनिष्क कदम- सुवर्णपदक.
४८ किलो रोहित मकवणे – रौप्यपदक.
८० किलो आदित्य परांडे – रौप्यपदक.
११० किलो पृथ्वीराज कोकाटे – रौप्यपदक.
६० किलो पृथ्वीराज कोंडे – कास्यपदक.
७१ किलो वैष्णव आडकर – कास्यपदक.
९२ किलो निरंजन मारणे – कास्यपदक.