पुणे : फुलांची आकर्षक सजावट, रांगोळ्यांच्या पायघड्या, बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर..अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा रंगत आहे. मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू झाली.
आतापर्यंत मानाच्या तीन गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यानंतर आता मानाच्या चौथ्या महागणपती तुळशीबाग गणपतीचे पंचलेश्वर घाट येथे ८.वाजून २ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.
दरम्यान, दुसऱ्या गणपती विसर्जनानंतर तब्बल दोन तासानंतर तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आता मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीचे विसर्जन करण्यात आले.