चिंचवड – सार्वजनिक गणेशोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेश मंडळांच्या स्वागतासाठी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि त्यांच्या पत्नी चिंचवड येथे उपस्थित आहेत.
चिंचवड, चापेकर चौकात महापालिका आणि पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, विकास ढाकणे यांच्यासह आदी अधिकाऱ्यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान, वेताळनगर येथील शिवतेज मित्र मंडळ दुपारी सव्वा तीन वाजता विसर्जनासाठी घाटाकडे रवाना झाले. सायंकाळी पावणेआठ वाजेपर्यंत विसर्जनासाठी घाटाकडे 11 मंडळे रवाना झाली होती.