बिबवेवाडी – भगवान महावीर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा शांती व अहिंसेचा संदेश समाजापर्यंत पोहचावा, यासाठी रविवारी पहाटे पुणेकरांनी धाव घेतली. जीतो अपेक्सतर्फे आयोजित “अहिंसा रन’मध्ये पुणे चॅप्टरच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुमारे 6 हजारांवर नागरिकांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला.
सर परशुरामभाऊ महाविद्यालय मैदानावरून ही दौड सुरू झाली. तीन विभागांमध्ये ही दौड होती. पहिला टप्पा 10 कि.मी. अंतराचा होता. दुसरा टप्पा 5 कि.मी. आणि तिसरा टप्पा 3 कि.मी. अंतराचा होता. आमदार माधुरी मिसाळ आणि ऍड. एस. के. जैन यांच्या हस्ते झेंडा दाखवून दौड सुरू झाली. उपक्रमास युक्रेनमधून विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणणाऱ्या पायलट शिवानी कालरा, अर्जुन पुरस्कार विजेत्या तेजस्विनी सावंत, एसकेपी कॅम्पस बालेवाडीचे सागर बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जीतो श्रमन आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेश सांकला, लेडीज विंगच्या राष्ट्रीय अध्यक्ष संगीता ललवानी, मुख्य सचिव चेतन भंडारी, जीतो अपेक्सचे उपाध्यक्ष कांतिलाल ओसवाल, जीतो पेक्स जेएटीएफ चे उपाध्यक्ष इंदर जैन, आरओएम चे अध्यक्ष अजित सेठिया, आरओएम जेएटीएफ चे अध्यक्ष इंदर छाजेड, विजयकांत कोठारी, जीतो पुणेचे उपाध्यक्ष मनोज छाजेड, नरेंद्र छाजेड, सुदर्शन बाफना, जीतो अपेक्स चे संचालक अचल जैन, धीरज छाजेड, जीतो पुणे लेडीज विंग अध्यक्ष लकीशा मर्लेचा, मोना लोढा, युथ विंगचे अध्यक्ष निकुंज ओसवाल, मुख्य सचिव सिद्धार्थ गुंदेचा, सचिव दिनेश ओसवाल, खजिनदार किशोर ओसवाल, दिलीप जैन, संजय डागा, आरओएम झोन रोम चे पंकज कर्नावट व आदेश खिंवसरा, समन्वयक वैशाली छाजेड, जीफ चे सचिव सुजीत भटेवरा, दीपक जैन, अमोल कुचेरिया, आकाश ओसवाल, प्रीत व रुपेश सोलंकी सोलंकी, वर्धमान पुंगलिया, अमित भटेवरा, सिद्धांत छाजेड व यूथ बोर्ड टीम आणि जीतो पुणे चॅप्टर बोर्ड चे सर्व पदाधिकारी व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.