पुणे – आखाडातील शेवटच्या रविवारी पुणेकरांनी 40 ते 45 टन मासळी, दीड ते दोन हजार बोकडांचे मटण फस्त केले. नागरिकांनी सकाळपासून दुकांनासमोर रांगा लावल्या होत्या. त्या रांगा दुपारी, संध्याकाळी, दुकाने बंद होईपर्यंत अनेक ठिकाणी असल्याचे पाहायला मिळाले.
आखाडीतील शेवटच्या रविवारी (दि.16) अनेकांनी अनेक जण सामिष पदार्थांचे भोजन करतात. सोमवारी (दि.17) गटारी अमावस्या आहे. सोमवारी अनेकजण मांसाहार करत नाहीत. मंगळवार (दि.18) पासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहार करत नाहीत. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असतो. कित्येकजण दिवाळीपर्यंत मांसाहार करण्याचे टाळतात. या पार्श्वभूमीवर आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी पुणेकरांनी आवर्जून मांसाहाराचा बेत आखला होता.
दरवर्षी पुणेकर आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार हॉटेलमध्ये जाऊन साजरा करत असतात. मात्र, यंदा घरी आणि बाहेर हॉटेलमध्ये जाऊन आखाडी साजरी करण्यास पसंती देण्यात आली आहे. याविषयी मासळीचे व्यापारी ठाकुर परदेशी म्हणाले, शुक्रवारपासूनच (दि.14) मासळीला मोठी मागणी आहे. हॉटेल चालकांसह किरकोळ विक्रेत्यांकडून मासळीला मागणी आहे. सुरमई, पापलेट, बांगडाच्या भावात तीन दिवसात सुमारे 20 ते 30 टक्के वाढ झाली आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून आवक होत आहे. कोकणातून आवक होत आहे. मात्र, ती खूपच नगण्य आहे. उद्या (सोमवारी) गटारी आहे. मात्र, सोमवारमुळे मागणी कमी असण्याची शक्यता आहे. रविवारी गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुदातील मासळीची 20 ते द25 टन, खाडीच्या मासळीची 200 ते 300 किलो, तर, नदीच्या मासळीची 500, आंध्र प्रदेश येथून रहु, कतला आणि सिलनची मिळून 15 ते 20 टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकुर परदेशी यांनी दिली.
पुणे मटण दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, घरगुती ग्राहकांपेक्षा हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी आहे. यंदा दोन श्रावण महिने आहेत. त्यामुळे श्रावण पुढच्या महिन्यात लोक पाळतील, अशी शक्यता दिसून आहे. दरम्यान चिकनलाही मोठी मागणी होती. मात्र, ते किती खपले, हे समजू शकले नाही.
मासळीचे घाऊक बाजारातील भाव (प्रतिकिलो) :
समुद्रातील मासळी : पापलेट : कापरी : 1200-1600, मोठे : 1400-1500, मध्यम : 1100-1200 : लहान 1000-1100, भिला : 700, हलवा : 650-800, सुरमई : 550-850, रावस-लहान : 650-1000, मोठा : 1000-1200, घोळ : 900-1000, पाला : 1200-800 वाम : पिवळी : 800-900, काळी 400-480, ओले बोंबील : 200-320, कोळंबी-लहान : 200-280, मोठी : 360-600
जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1500, मोरी : 280-400, मांदेली : 160-180, खेकडे : 240-320, चिंबोऱ्या : 500-600.
खाडीची मासळी : सौंदाळे : 280-328, खापी : 360-400, लेपा : 240-280.
नदीची मासळी : रहू : 160-180, कतला : 160-180, मरळ : 360-400, शिवडा : 160-200, खवली : 200-240, आम्ळी : 120-160, खेकडे : 240-280, वाम : 480-500. मटण : बोकडाचे : 740, बोल्हाईचे : 740, खिमा : 740, कलेजी : 740.
चिकन : चिकन : 240, लेगपीस : 280, जिवंत कोंबडी : 180, बोनलेस : 320.
अंडी : गावरान : शेकडा : 880, डझन : 120, प्रति नग : 10. इंग्लिश : शेकडा : 515, डझन : 72, प्रतिनग : 6