पुणे – रेल्वेच्या पुणे विभागातर्फे पहिली विशेष कार्गो गाडी खडकी स्थानकावरून संकरेल-हावडा येथे रवाना करण्यात आली. या गाडीतून प्रामख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांची (व्हाईट गुड्स) वाहतूक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. त्यामुळे मालवाहतूक वाढविण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू होते. त्यानुसार पुणे स्थानकातून पहिली विशेष कार्गो गाडी रवाना करण्यात आली. या गाडीतून प्रामख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांची वाहतूक करण्यात आली.
याआधी पुण्यातून रेल्वेने तुरळक संख्येने पार्सल पाठवले जायचे. हे पार्सल संधित ठिकाणी जाणाऱ्या गाडीला पार्सलचा डबा लावून पाठवले जायचे. त्यामुळे पार्सलद्वारे महसूल वाढविण्यासाठी विभागीय व्यवसाय विकास पथकाने रांजणगाव आणि चाकण एमआयडीसीतील विविध कंपन्यांशी चर्चा केली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या गाडीला 14 डबे असून त्यात 90 टक्के इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत.
महिन्याला सव्वा कोटीचा महसूल
रेल्वेच्या पुणे विभागाकडून नियमितपणे देशांतर्गत ऑटोमोबाइल, साखर, पेट्रोलियम उत्पादनांसह विविध वस्तूंची वाहतूक केली जाते. आता कार्गो विशेष गाडी संकरेल-हावडा येथे रवाना करण्यात आली. या सेवेमुळे रेल्वेला महिन्याला एक ते सव्वा कोटी रुपये महसूल मिळणार आहे.