पुणे – महापालिकेकडून तातडीच्या देखभाल दुरूस्तीसाठी गुरुवारी (दि. 26 ) बहुतांश शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यात पर्वती जलकेंद्र पंपिंग, लष्कर जलकेंद्र पंपिंग, एस.एन.डी.टी , वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्रावरून केला जाणारा पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर वडगाव जलकेंद्र आणि भामा आसखेड जलकेंद्र नियमित सुरू राहणार असल्याने सिंहगड रस्ता, कळस-धानोरी तसेच विश्रांतवाडीमधील पाणी पुरवठा नियमित सुरू असणार आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मीठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं 42, 46 (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र.
लष्कर जलकेंद्र पंपिंग भाग : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडिवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी इत्यादी.
चतु:शृंगी / एसएनडीटी/वारजे जलकेंद्र :- भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भूगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हायवे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरूड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकात नाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, पोलिस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड परिसर
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग : मुळा रोड, खडकी, एमईएस, हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरी, हरिगंगा सोसायटी इत्यादी.