पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे मंगळवारी 196 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
कोविशील्डचे 185 केंद्रांवर प्रत्येकी 160 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोवॅक्सिनचे 140 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कोवॅक्सिनचे डोस 11 केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशील्डच जो पहिला डोस मिळणार आहे त्याच्या ऑनलाइन बुकींगची टक्केवारी 15 टक्के असून, ऑन दि स्पॉट बुकींगही 15 टक्के आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकींग करून तर 15 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
15 जून पूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मंगळवारी जी लस मिळणार आहे त्याचे ऑनलाइन बुकींग 35 टक्के तर 35 टक्के ऑन दि स्पॉट बुकींग होणार आहे.