गुगलवर सगळ्या पहिल्यांदा कोणता शब्द सर्च करण्यात आला?

न्यूयॉर्क – 4 सप्टेंबर 1998 रोजी स्थापन झालेल्या गुगलला आता 23 वर्षे झाली असून या काळात कंपनीचे बाजारमल्य 1 ट्रिलियन डॉलरवर पोचले आहे. या गुगलविषयी काही रंजक माहिती.

इंटरनेट लाईव्ह स्टॅटिस्टिक्सच्या माहितीनुसार गुगलवर सेकंदाला जवळपास 95 हजार सर्च केले जातात. म्हणजेच गुगलवर दिवसभरात 6 अब्ज प्रश्नांविषयी किंवा विषयांवर सर्च केले जाते. 1998 ला गुगलची स्थापना झाली तेव्हा दिवसाला फक्त 10,000 प्रश्न/विषय सर्च केले जात असत.

गुगलच्या जन्माची प्रक्रिया स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एका डॉर्मिटरीमध्ये सुरु झाली.
त्यावेळी गुगलचे संस्थापक वेळेच्या तुलनेत त्यांच्या अल्गोरिदमची अचूकता दाखवून देण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी कॅस्पर हा शब्द वापरण्यात आला होता. त्यात त्यांना यश आले होते. गुगल सर्चने त्यावेळी चर्चेत असलेल्या व्यक्तीशी संबंधित लिंक्स दाखवल्या होत्या तर त्यांचे प्रतिस्पर्धी सर्च इंजिन असलेल्या अल्टाविस्टाने 1995 मधील हिट झालेल्या कॅस्पर द फ्रेंडली घोस्ट या कार्टून मालिकेचे रिझल्ट दाखवले होते.

गुगलची 4 सप्टेंबर 1998 रोजी अधिकृतपणे स्थापना झाली आणि केवळ वर्षभरातच टाईम मासिकाने टॉप टेन बेस्ट सायबरटेक ऑफ 1999 च्या यादीत कंपनीचा समावेश केला होता.
ऑगस्ट 1998 मध्ये एक लाख डॉलरचे बीजभांडवल जमा केल्यानंतर गुगलचा 16 वा कर्मचारी व संस्थापकांच्या मित्राच्या कॅलिफोर्नियातील मेन्लो पार्क येथील गॅरेजमध्ये गुगलची सुरवात झाली.

गुगलच्या संकल्पनेला खरे तर 1995 मध्ये सुरवात झाली होती. विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संभाव्य पेजेस दाखवण्याची असाईनमेंट सर्जेई ब्रिनकडे सोपवण्यात आली होती. त्यासाठीच्या पहिल्या मीटींगमध्ये त्यांच्यात मतभेद झाले पण पुढच्याच वर्षी त्यांनी भागीदारीत काम सुरु केले. दशकभरातच भागीदाराची फळे मिळाली आणि ती इतकी मोठी होती की, शब्दकोशातील एक विशेषण म्हणून गुगलचा उल्लेख होऊ लागला.

डॉर्मिटरीतील खोल्यांमध्ये रहात असताना 1996 मध्ये लॅरी पेज आणि सर्जेई ब्रिन यांनी पहिले सर्च इंजिन बनवले होते. त्याचे नाव होते बॅकरब. वैयक्तिक पेजेस वर्ल्ड वाईड वेबवर असण्याचे महत्त्व समजण्यास या सर्च इंजिनच्या अल्गोरिदमचा उपयोग झाला.

चुकीच्या स्पेलिंगमधून गुगल नावचा जन्म
गुगल हे नाव अपघातातून पुढे आले आहे. सप्टेंबर 1997 मध्ये बॅकरब टीम सर्च अल्गोरिदम रिफाईन करत असताना त्यांना वेगळे नाव सापडत नव्हते. खूप विचार केल्यानंतर लॅरी पेजने गुगोल हे नाव सुचवले. हा एक गणिती आकडा आहे. 1 च्या पुढे शंभर शून्य लिहिली तर त्याला अंकाला गिनॉर्मस म्हणजेच गुगोल म्हणतात. अमेरिकी गणित तज्ज्ञ एडवर्ड कॅसनेर यांनी या संज्ञेचा 1940 मध्ये प्रथम वापर केला होता. या शोधाचे श्रेय त्यांनी त्यांच्या नऊ वर्षांच्या पुतण्याला दिले होते. गुगोलचे स्पेलिंग चुकीचे लिहिले गेल्याने ते गुगल असे झाले.

पेज, ब्रिन आणि स्टॅनफोर्डच्या डॉर्मिटरीतील त्यांच्या वर्गमित्रांना गुगोल हे नाव आवडले. मात्र त्या नावाचे इंटरनेट डोमेन नेम रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे का याचा शोध मित्रांनी घेताना गुगोल ऐवजी गुगल असे टाईप केल्याने नंतरच्या काही तासांतच गुगल डॉट कॉम हे नाव रजिस्टर झाले.

उलाढालीत जबरदस्त वाढ
2011 मध्ये गुगलची वार्षिक उलाढाल 37905 दशलक्ष डॉलर एवढी होती. 2020 पर्यंत ती 182527 दशलक्ष डॉलरपर्यंत पोचली.

सध्या गुगलची जगभरातील महत्त्वाच्या 170 शहरांमध्ये कार्यालये आहेत. 2001 मध्ये टोकियोपासून सुरवात करून 60 देशांमध्ये गुगलचे 1,44,000 कर्मचारी होते. 2015 मध्ये गुगलची फेररचना करण्यात आली आणि आत गुगल ही अल्फाबेट इन्कॉर्पोरेशनची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी आहे.

पहिले गुगल डुडल
ऑगस्ट 1998 मध्ये पेज आणि ब्रिन यांनी पहिले डुडल ऑगस्ट 1998 मध्ये बनवले होते. गुगलमधीस दुसऱ्या ओ च्या जागी त्यांनी माणसाची एक स्टिक फिगर काढली होती. त्याचा अर्थ गुगल भेट देणाऱ्यांना समजावे की, ऑफिसमधील सर्वजण नेवाडा वाळवंटातील बर्निंग मॅन फेस्टिव्हलसाठी बाहेर गेले आहेत. ते डुडल अगदीच बेसिक होते पण त्यातून नव्या कल्पनेचा जन्म झाला. गुगलने आतापर्यंत जगभरातील त्यांच्या होमपेजसाठी 4,000 हून अधिक डुडल्स बनवली आहेत.

रोजची भेट देणाऱ्यांची संख्या
गुगलचा असा दावा आहे की, त्यांच्या वेबसाईटवर येणाऱ्या 100 दशलक्षाहून अधिक व्हिजिटर्सना रोज गुगल वेगवेगळ्य संकेतस्थळांवर पोचवत असते. गुगलच्या रोजच्या सर्चमधील 15 टक्के प्रश्न हे पूर्णपणे नवीन असतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.