पुणे – पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसचे तीन तीन नाॅन एसी डबे चेअर कार डबे कमी केले जाणार आहेत. तर, एक स्लीपर, एक एसी 3 टायर इकॉनॉमी डब्यात वाढ केली जाणार आहे. पण, याचा फटका अप-डाउन करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.
हुतात्मा एक्स्प्रेससोबतच पुणे – अमरावती – पुणे आणि अमरावती – अजनी – अमरावती एक्स्प्रेसबाबतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या तीनही ट्रेन आता १७ ऐवजी १६ डब्यांच्या होणार आहेत. याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे कोणीही मागणी केली नसताना, असा निर्णय का घेण्यात आला? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
पुण्यातून दि. १७ डिसेंबर रोजी सुटणारी हुतात्मा एक्स्प्रेस नव्या रचनेसह धावणार आहे. तर, दि. १६ रोजी सुटणारी पुणे- अमरावती आणि अमरावती – अजनी एक्स्प्रेस कमी डब्यांची असणार आहे. या डब्यांची रचना बदलल्याचा फटका सुमारे दररोज सुमारे ५०० ते ७०० प्रवाशांना सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. आता सुधारित निर्णयानुसा या सर्व एक्स्प्रेसला जनरेटर – 01, स्लीपर – 02, एसी चेअर कार – 1, नॉन एसी चेअर कार-10 , एसी 3 टायर इकॉनॉमी – 01 आणि गार्ड ब्रेक यान -01 असे एकूण 16 एलएचबी कोच जोडले जाणार आहेत.