पुणे – एसटीची मालवाहतूक महागली

पुणे -लॉकडाऊनपासून एसटी महामंडळानेदेखील मालवाहतुकीवर भर दिला आहे. या मालवाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या वाहतुकीच्या प्रत्येक टप्प्यात दोन रुपयांनी वाढ केली असून, गुरुवारपासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर एसटीने प्रवासी वाहतूक स्थगित केली. त्यानंतर आर्थिक घडी सुधारण्यासाठी महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबर मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. आयुर्मान पूर्ण केलेल्या प्रवासी वाहनांमध्ये अंतर्गत बदल करून मालवाहतूक सुरू केली आहे. यांसह मालवाहतूक वाढवण्याच्या अनुषंगाने विभागीय पातळीवर स्वतंत्र कक्ष देखील स्थापन करण्यात आले आहेत.

एसटीच्या पुणे विभागात मालवाहतुकीसाठी 72 बसेस आहेत. यातील 50 ते 52 बसेस दररोज धावतात. मालवाहतुकीसाठी तीन टप्प्यांमध्ये दर आकारण्यात येते. पहिल्या शंभर किलोमीटरपर्यंत 46 रुपये, शंभर ते अडीचशे किलोमीटरदरम्यान 44 रुपये आणि अडीचशे किलोमीटरच्या पुढे 42 रुपये असा दर आकारण्यात येत होता. या दरात आता प्रत्येक टप्प्यासाठी दोन रुपयांची वाढ केली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.