वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली येथील गायरान जमिन गट नं. १११९ व ११२३ मधील एकुण ३.५ एकर जागेमध्ये सिव्हिल हॉस्पीटल व ट्रामा सेंटर सुरु करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली शासन स्तरावर यासाठी प्रशासकीय स्तरावरील पाठपुरावा सुरू होता.
प्राथमिक आरोग्य केंद्र मौजे वाघोली, ता. हवेली, जि. पुणे येथे ट्रामा केअर युनिट स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने सादर केला होता. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र मौजे वाघोली, ता. हवेली, जि. पुणे येथे ट्रामा केअर युनिट स्थापन करण्यास एक विशेष बाब” म्हणून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
तसेच सदर ट्रामा केअर युनिट करीता विहीत पध्दतीने जागा उपलब्ध करुन तेथे बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल. असा जी आर २८ जून रोजी शासनाने काढला आहे. असून लवकरच हॉस्पीटल सुरू होणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली आहे.
याबाबत रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले की ग्रामपंचायत वाघोलीने ग्रामसचिवालय बांधकामा साठी वाघोली येथील गायरान जमिन गट नं. १११९ व ११२३ मधील एकुण ३.५ एकर जागा महाराष्ट्र शासनाकडुन मा. मुख्य कार्यराकी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचे नावे वर्ग करुन घेतली होती. परंतु वाघोली गावचा दिनांक ३०/०६/२०२१ रोजी पुणे महानगर पालिकेमध्ये समावेश झाला आहे. सदर जागेचा ७/१२ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे नावे असल्याने सदर जागा पुणे महानगर पालिकेकडे वर्ग झालेली नाही.
वाघोली हे गाव पुणे-नगर रस्त्यावरील मुख्य गाव आहे. वाघोली गावाची आज रोजीची लोकसंख्या २ ते २.५ लाख इतकी आहे. तसेच वाघोली व पुणे शहराच्या पुर्व भागामध्ये २५ गावे आहेत. या गावामध्ये सर्व प्रकारच्या सोयी असणारे कोणतेही शासकीय मोठे रुग्णालय नाही त्यामुळे वाघोली पासुन लोणीकंद, शिक्रापुर, शिरुर ते नगरपर्यंत सर्व रुग्णांना उपचारासाठी पुणे येथील सिव्हिल हॉस्पीटल मध्ये जावे लागत आहे. या सर्व रुग्णांना पुण्यामध्ये जाणेसाठी वाघोली मधूनच जावे लागते.
परंतु दिवसेंदिवस वाघोली पासुन पुणे शहरामधील वाढत असणारी गर्दी व त्यामुळे होणारी वाहतुक कोंडीमुळे कित्येक रुग्णांना वेळेमध्ये उपचार मिळत नाही. वाघोली येथील अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचे मालकीची गायरान जमिन गट नं. १११९ व ११२३ मधील पुणे नगर रस्त्यावरील केसनंद फाटा या ठिकाणचे एकुण ३.५ एकर क्षेत्रामध्ये वाघोली व परिसरामधील लोकांसाठी सिव्हिल हॉस्पीटल व ट्रामा सेंटर सुरु केल्यास निश्चितपणे वाघोलीसह पुर्व भागामधील २५ गावे व नगर महामार्गाद्वारे पुण्यामध्ये येणाऱ्या सर्वच रुग्णांसाठी याचा फायदा होणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.
वाघोली येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. वाघोलीतील जिल्हा परिषदेच्या मालकीची तीन एकर १७ गुंठे जमीन असून ही जमीन ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावे हस्तांतरित करण्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली होती. दि. २८ फेब्रुवारी रोजी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी सुचविलेल्या या प्रस्तावाला कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी अनुमोदन दिले होते. आता, जागा असतानाचा हा प्रस्ताव शिफारस करून ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर पुढील प्रक्रिया आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले आहे.
दाभाडे यांच्या भेटी गाठींना यश…
वाघोली येथे सर्व सोईयुक्त हॉस्पिटल व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच प्रशासकीय अधिकारी वर्ग यांचेकडे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांचा पाठपुरावा तसेच भेटीगाठींचा वेग वाढला होता त्यास यश मिळाले आहे.
दाभाडे यांच्या भेटी गाठींना वेग…
वाघोली येथे सर्व सोईयुक्त हॉस्पिटल व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच, प्रशासकीय अधिकारी वर्ग यांचेकडे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांचा पाठपुरावा तसेच भेटीगाठींचा वेग वाढला होता त्यास यश मिळाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र मौजे वाघोली, ता. हवेली, जि. पुणे येथे ट्रामा केअर युनिट स्थापन करण्यास एक विशेष बाब” म्हणून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.. याकामी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे व ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता ग्रामस्थांच्या वतीने शासनाचे आभार
– महेंद्र भाडळे / माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली