पुणे – पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची आज बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेखर गायकवाड पालिका आयुक्तपदावरून हटवून त्यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तीन महिन्यांपूर्वीच गायकवाड यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. गायकवाड यांनी सौरभ राव यांच्यानंतर पदभार स्वीकारला होता. मात्र अवघ्या तीन महिन्यात त्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याने त्यांना पुन्हा एकदा साखर आयुक्त म्हणून काम पाहावे लागणार आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात