पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे “कोविशील्ड’चे डोस शिल्लक नसल्याने महापालिकेने शनिवारी केवळ “कोवॅक्सिन’चे डोस देण्यात येणार आहेत. तेही ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांनाच तो देण्यात येणार आहे.
45 वर्षांवरील नागरिकांसाठी शनिवारी 15 केंद्रांवर लस देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर 100 लस देण्यात येणार असून, शनिवारी दीड हजारच लसीचे डोस देण्यात येणार आहेत. तसेच 16 एप्रिल पूर्वी ज्या नागरिकांनी “कोवॅक्सीन’चा पहिला डोस घेतला आहे त्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे.