अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या “हम भी अकेले; तुम भी अकेले’मध्ये झरीन खानने लेसबियन महिलेचा रोल साकारला आहे. ती या रोलसाठी योग्य असल्याबाबत निर्मात्यांच्या मनात साशंकता होती.
मात्र, आपल्याबाबत अशी शंका वाटण्याची ही पहिली वेळ नव्हती, असे झरीन म्हणाली. लेसबियन महिला साकारणे काही विशेष अवघड नव्हते.
आपली शारीरिक ठेवण थोडीशी टॉमबॉय स्वरूपाची असल्याने या सिनेमासाठी त्याचा फायदाच झाला. लेसबियन महिला साकारताना केवळ अशा व्यक्तींच्या मनात काय भावना असतील, याचा अंदाज करावा लागला, असे झरीन म्हणाली.
झरीनने 2010 मध्ये सलमानबरोबर “वीर’ मधून पदार्पण केले होते. आपला रोल प्रामाणिकपणे साकारण्याकडे झरीनचा कल होता.
यापुढेही आपल्या रोलला योग्य न्याय देण्याकडेच तिचा कल असणार आहे. त्यामुळे रोलबाबत काही वेगळा विचार करत नसल्याचेही तिने सांगितले. “हम भी अकेले, तुम भी अकेले’ डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर रिलीज झाला आहे.