पुणे –शहरातील करोना रुग्णांची संख्या घटल्याने तसेच लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाल्याने शासनाच्या आदेशानुसार, शहरातील गर्दीच्या कार्यक्रमांवरील निर्बंध वगळता इतर सर्व निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी दिले आहेत. त्यानुसार, राजकीय, सामाजिक,धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक अशा गर्दीच्या कार्यक्रमासाठी एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती असणार आहे. खडकी तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासाठीही हे आदेश लागू असणार आहेत.
- सुधारीत आदेश…
- राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, लग्न, अंत्यस्कार यासाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती, एक हजार पेक्षा अधिक उपस्थिती असल्यास मान्यता घ्यावी लागणार.
- दिव्यांग शाळा, कार्यशाळा, प्रशिक्षण संस्था, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.
- मॉल्स, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, मनोरंजन पार्क, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे 100 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
- लसीकरण झालेले असल्यास आंतरराज्य प्रवासास बंधन नाही.
- सर्व प्रकरची कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
- बस, रिक्षा, पीएमपी, टॅक्सी पूर्ण क्षमतेने सुरू राहील.