लस नसतानाही केंद्रांवर ज्येष्ठांच्या रांगा

आजही फक्‍त 18 ते 44 वयोगटाचेच लसीकरण होणार

पुणे   -शनिवारी शहरात 6 लसीकरण केंद्रांवर केवळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण केले जाणार असल्याचे महापालिकेने जाहीर केल्यानंतरही या केंद्रांवर 45 आणि 65 वर्षांवरील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, लस नसल्याने तसेच केवळ निश्‍चित केलेल्या वयोगटासाठीच लसीकरण होणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतरही अनेक जण दोन ते तीन तास लसीकरण केंद्रावरून संतापाने निघून गेल्याचे दिसून आले. दरम्यान, रविवारी फक्त 18 ते 44 या वयोगटासाठी शहरातील चार केंद्रांवर लसीकरण होणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेला केवळ 1700 कोविशील्ड लसीचा साठाच पालिकेकडे उपलब्ध आहे.

महापालिकेने मागील आठवडयात लस मिळाल्यानंतर शुक्रवारपासून 18 ते 44 या वयोगटासाठी शहरात हडपसर येथील आण्णासाहेब मगर दवाखाना, कोथरूड येथील जयाबाई सुतार दवाखाना, धायरीतील मुरलीधर लायगुडे दवाखाना आणि ससून रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येथे लसीकरण केंद्र सुरू केले होते. मात्र, लसींचा साठा मर्यादित असल्याने शनिवारी केवळ 18 ते 44 वयोगटासाठी हडपसर, कोथरूड, धायरी आणि ससून रुग्णालय या चार ठिकाणी लसीकरण झाले.

मात्र, या नोंदणी झाली नसली, तरी प्रत्यक्ष केंद्रावर गर्दी नसेल तर आपल्याही लस मिळेल या आशेने अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठीची नोंदणी न करताच थेट केंद्र गाठत लसीसाठी विचारणा केली. त्यांना, त्या ठिकाणी लस देण्यात येणार नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते, मात्र, अनेक जण तीन ते चार तास लस मिळेल या आशेवर या केंद्रावर घुटमळत होते. तर रविवारीही तरुणांसाठी चार केंद्र सुरू राहणार असल्याने केवळ नोंदणी असलेल्यांनीच यावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.