तुम्हाला मिळेल डोअरस्‍टेप बँकिंग सुविधा…

घर बसल्या पैसे जमा करण्याची ‘या’ बँकांकडून सुविधा

नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात अनेक राज्यांत लॉकडाऊन, नाईट कर्फ्यूसह इतर अनेक निर्बंधांमुळे कोणालाही घराबाहेर पडणे शक्य नाही. कमीत कमी संख्येने ग्राहक शाखेत येतील, यासाठी बँकाही प्रयत्नशील आहेत. त्यामुळे बँक कर्मचारीही सुरक्षित राहतील. हे पाहता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी साथीच्या पार्श्वभूमीवर डोअरस्टेप बँकिंगची सुविधा सुरू केलीय. याअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत अनेक प्रकारे बँकिंग सेवा पुरविली जात आहे. वृद्धांसाठी हृयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँक खात्यातून पैसे काढणे किंवा जमा करणे यांसारखी सुविधा उपलब्ध आहे.

अशा प्रकारे जर तुमचे बँक खाते कोणत्याही सरकारी बँकांमध्ये असेल, तर तुम्हाला बँक शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. बँक स्वतःच तुमच्या दारात येईल. या सेवांसाठी ग्राहकांकडून निश्चित रक्कम घेतली जाईल. कोरोना काळात घर बसल्या कोट्यवधी ग्राहकांना बँकिंग सुविधा मिळणार आहे. आपल्याला देखील आवश्यक असल्यास या बँकिंग सेवेचा फायदा घेता येईल.

जर आपले बँक खाते बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि/किंवा आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असाल तर तुम्हाला डोअरस्‍टेप बँकिंग सुविधा मिळेल.

डोअरस्टेप बँकिंगद्वारे दिलेल्या विना-वित्तीय बँकिंग सेवा
1. चेक/ड्राफ्ट/पे ऑर्डर इत्यादी पाठवणे आणि नवीन चेकबुक मागविण्याची सुविधा.
2. बॅंकेकडून 15G/15H आणि IT/GST चलन घेण्याची सुविधा.
3. अकाऊंट स्‍टेटमेंट, टर्म डिपॉझिटची पावती, अकनॉलेजमेंट मागविण्याची सुविधा.
4. TDS आणि फॉर्म 16 प्रमाणपत्र डिलिव्हरी
5. प्रीपेड उपकरणे किंवा गिफ्ट कार्ड वितरण

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ग्राहक डोअरस्टेप बँकिंग मोबाईल अ‍ॅप किंवा वेब पोर्टलवर किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून रोख पैसे काढण्याच्या सेवेसाठी विनंती करू शकतात. रोख रक्कम काढण्याच्या सेवेसाठी ग्राहकांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्ड किंवा डेबिट कार्डशी जोडले जावे. विनंती घेतल्यानंतर बँक एजंट ग्राहकाच्या घरी जाईल आणि मायक्रो एटीएमद्वारे रोख रक्कम प्रदान करेल. प्रत्येक व्यवहारात किमान पैसे काढण्याची मर्यादा एक हजार रुपये आहे आणि जास्तीत जास्त रोख पैसे काढण्याची मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत आहे.

सद्य परिस्थितीत वृद्धांनी बँक शाखेत जाणे योग्य नाही. अशा परिस्थितीत पेन्शनधारकांना डोअरस्टेप बँकिंग अंतर्गत हयातीचा दाखल सादर करण्याची सुविधादेखील मिळत आहे. ग्राहकाच्या विनंतीनंतर बँक ग्राहकांच्या घरी जाऊन हयातीचा दाखला अ‍ॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने सबमिट करेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.