पुणे – ‘बालगंधर्व’ नूतनीकरण प्रस्तावांचे सादरीकरण

पुणे – बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी आलेल्या आठ प्रस्तावांचे पुनर्विकास समितीसमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, मुरलीधर मोहोळ, आयुक्त सौरभ राव, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आदी उपस्थित होते.

याठिकाणी मल्टिप्लेक्‍स सांस्कृतिक केंद्र उभे राहणार आहे. येथे अत्याधुनिक दर्जाचे 4 नाट्यगृहं याठिकाणी होणार आहेत. प्रशासनाने नव्या वास्तुतील मुख्य रंगमंचासह तीन छोटे रंगमंच, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हॉल, कलाकार आणि प्रेक्षकांच्या वाहनांसाठी वाहनतळ, कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था आदी सुविधा उभारण्याचे नियोजन वास्तुविशारदांनी आपल्या नकाशांमध्ये केले आहे. विशेष म्हणजे, या वास्तुशेजारून जाणाऱ्या मेट्रो, एमएमपी, सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्गांना प्रेक्षकांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नव्या इमारतीच्या रचनेचे सादरीकरण झाल्यानंतर प्रत्यक्ष निविदांची प्रक्रिया होईल. मात्र, नव्या वास्तूत सर्व सुविधा असतील. जुनी वास्तू न पाडता नवी थिएटर बांधता येईल, याची माहिती जाणून घेतली आहे. या सादरीकरणात नव्या वास्तूचा खर्च 70 ते 126 कोटी रुपये आहे, असल्याचे भिमाले आणि मोहोळ यांनी सांगितले.

बालगंधर्व रंगमंदिराच्या नव्या वास्तूचा खर्च 125 कोटी रुपयांपेक्षा अधिक असला, तरी एका कंपनीने “विकास हस्तांतरण हक्क’ (टीडीआर) माध्यमातून बांधकाम करता येईल, याचा अंदाज दिला आहे. तसेच, या नव्या थिएटर आणि जागेतून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते, त्याच्या योजनाही या सादरीकरणातून मांडल्याचे भिमाले यांनी सांगितले.
यावर आता समिती निर्णय घेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)