पुणे – पीएमपीची हिंजवडी-विमानतळ बससेवा बंद होणार?

अल्प उत्पन्न पाहता प्रशासन निर्णयाच्या तयारीत

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाची हिंजवडी ते विमानतळ या मार्गावर धावणारी एसी बससेवा बंद करण्यात येणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्रवाशांना वातानुकूलित प्रवास करता यावा, यासाठी पीएमपीएल प्रशासनाकडून शहरातील काही मार्गांवर एसी सेवा दिली जाते. निगडी ते कात्रज, हडपसर ते निगडी आणि िंहंजवडी ते एअरपोर्ट या मार्गावर सध्या पीएमपीएलची एसी बससेवा सुुरू आहे. मात्र, अल्प उत्पन्नामुळे हिंजवडी ते विमानतळ या मार्गावरील सेवा बंद करण्यात येणार आहे.

हिंजवडी हे आयटी हब असल्याने याठिकाणावरून विमानतळावर जाणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात जास्त आहे. यामुळे येथून बस सोडण्यात येत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी विमानतळ प्रशासनाने पीएमपी बसला विमानतळाच्या आत येण्यास बंदी घातली. यामुळे प्रवाशांना बाहेरील गेटवर सोडले जात होते. परिणामी प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या बसला अधिक उत्पन्न मिळत नसल्याने प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी एसी बसचे भाडे कमी केले होते. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानेही याला मंजुरी दिली. यानंतर िंहजवडी ते एअरपोर्ट या मार्गावरील भाडे हे 180 रुपयांवरुन 110 रुपये करण्यात आले. मात्र, तरीदेखील प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे ही सेवा बंद करण्यात येणार आहे.

शहरातून विमानतळावर ही एकमेव बस जात होती. यामुळे ही बस बंद झाल्यास सद्यस्थितीत विमानतळासाठी थेट एकही बस नसल्याचे दिसून येते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)