आम आदमी पक्षाची मागणी
पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने स्टाॅप गॅप व्यवस्था उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी व्हाॅस्ट्सअॅप चॅनलच्या माध्यमातून ही सुविधा सुरू व्हावी, अशी मागणी आप ने पीएमपीचे अध्यक्ष संजीव कोलते यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे सांगितले.
पीएमपी बसचा प्रवास म्हटल्यावर बस कधी येईल, ती सध्या कुठे असेल याची शाश्वती देणे थोडे अवघडच आहे. प्रवाशांना ही सर्व माहिती मिळण्यासाठी आयटीएमएस आणि पीएमपीएमएल ई-कनेक्ट अॅपवर पाच वर्षांपासून काम सुरू आहे.
मात्र, अद्याप ते सुरू झाले नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी स्टॉप गॅप व्यवस्था उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली आहे. यामध्ये व्हाॅस्ट्सअॅप चॅनलच्या माध्यमातून डेपोमधून सुटणाऱ्या बसची सर्व माहिती मिळावी.
त्यामध्ये बस क्रमांक, मार्ग क्रमांक यासह अन्य माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होईल, त्यांचा वेळ वाचेल. हा एक परिपूर्ण उपाय नसला तरी प्रवासांसाठी उपयोगी आहे, असे आपने सांगितले.