पुणे – जोरजोरात ओरडून भाजी विक्री करत असताना आवाजाच्या कारणावरून लोखंडी साहित्याने मारहाण करून, तसेच चाकुने भोकसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात एकाला सत्र न्यायाधीश एस.व्ही. सहारे यांनी जामीन मंजुर केला.
प्रथमदर्शनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकाविल्याचे दिसून येत आहे. त्याने कागदपत्रांच्या आधारे घटनेच्या वेळी तो ऑफीसला असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे तो घटनेच्या ठिकाणी हजर असणे शक्य नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
मुस्तफा ऊर्फ मुस्तू नझीर शेख (वय 29, रा. रविवार पेठ, काची आळी) असे त्याचे नाव आहे.
त्याने ऍड. शिवप्रसाद साळुंके यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्याला गुन्ह्यात अडकाविण्यात आले आहे. घटना 1 जून 2021 रोजी घडली. मात्र, एफआयाअर विलंबाने 3 तारखेला दखल करण्यात आले आहे. त्याचा विशिष्ट असा कोण्ताही रोल नाही. त्याच्याकडून कसलीही जप्ती झालेली नाही. आरोपींनी लाथबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे 307 लागू होत नसल्याचा युक्तीवाद ऍड. शिवप्रसाद साळुंके यांनी केला. तसेच, घटनेच्या वेळी आरोपी ऑफीसला असल्याचे फुटेज न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत काची आळी येथील अनिरूध्द इनामदार (वय 20) याने फरासखाना पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी, त्याचा भाऊ अनुराग आणि देवांग सचिन कंट्रोल्लू हे तिघे घटनेत जखमी झाले आहेत.
या प्रकरणाती सुमारे 18 ते 20 जणांवर गुन्हा दाखल आहे. तिघे जोरजोरात ओरडून भाजी विकत होते. त्यामुळे लाथाबुक्क्यांनी, लोखंडी, साहित्याने, तसेच एकाने देवांग याला चाकुने पोटात भोकसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यापैकी न्यायालयीन कोठडीत असताना मुस्तफा याने जमिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजुर विविध अटींवर मंजुर केला.