कात्रज (प्रतिनिधी) – कात्रज येथील प्राणी संग्रहालयात तीन मादी बिबट्या असून त्यांच्याकरिता नर जातीचा बिबट्या आणण्यात आला होता. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटक येथून आणण्यात आला होता. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे अनाथालयात बिबट्या विलगीकरनात ठेवण्यात आला होता. मात्र दि ४ मार्च रोजी पहाटे तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली की, पिंजऱ्यामध्ये बिबट्या नाही.
पिंजऱ्याचे गज वाकवून तेथून प्रसार झाल्याचे असे प्राथमिक दर्शनी दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. कात्रज येथील स्व. रजीव गांधी प्राणीसंग्रहालयात असलेल्या सरपोद्यान शेजारी प्राण्यांचे अनाथालय असून त्या ठिकाणी विविध ठिकाणावरून आणलेले प्राणी विलगीकरणात ठेवण्यात येतात व तेथे त्यांची काळजी घेण्यात येते.
मात्र आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यातून पळाला असल्याकारणाने सकाळपासूनच सरपोज्ञान पर्यटकांसाठी पाहण्यासाठी बंद करण्यात आले होते. सकाळपासून बिबट्याला शोधण्यासाठी प्राणी संग्रहालयात पथके तैनात करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत बिबट्या निदर्शनास आला नाही.
पहाटे पिंजरा मधून बिबट्या प्रसार झाल्याचे लक्षात आल्यापासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पथके तैनात करण्यात आले असून,सर्वोत्परी प्रयत्न सुरू आहे लवकरात लवकर त्याला जेरबंद करण्यात येईल. स्व राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी यावेळी सांगितले.
कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे सव्वाशे एकरामध्ये असून यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत तसेच या प्राणी संग्रहालयाच्या शेजारी दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे बिबट्या प्राणी संग्रहालयातच आहे की बाहेर पडायल आहे आत्तापर्यंत सांगणे कठीण आहे. कात्रज प्राणी संग्रहालयात 125 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यामध्ये बिबट्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.