पुणे – पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (दि.16) पोलिस आयुक्तलयातील कॉप्स एक्सलन्स हॉलमध्ये दरबार भरवून 81 पोलिस अंमलदारांच्या बदल्या केल्या. थेट पोलिस आयुक्तांनी बदली प्रक्रिया राबविल्यामुळे कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
धडाकेबाज निर्णयासाठी प्रसिद्ध असलेले पोलिस आयुक्त अमितेश कुमार पारदर्शी प्रशासन राबविण्यात अग्रेसर असल्याचेया निमित्ताने दिसून आले. आयुक्तांसमोर ‘कुणाला कोठे बदली पाहीजे, असे विचारून तेथे नियुक्ती करण्यात आली.
यात अनेकांना चॉईस पोस्टिंग मिळाल्याने कर्मचार्यांनीही आनंद व्यक्त केला. आयुक्तालयात प्रथमच अशा पारदर्शक पद्धतीने बदल्या झाल्या ज्या अमंलदारांना एकाच ठिकाणी पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे.
अनेक वर्षापासून जे अंमलदार एकाच ठिकाणी तळ ठोकून आहेत. अशा अंमलदारांच्या प्रामुख्याने या बदल्या करण्यात आल्या आहेत. आस्थापन विभागाकडून ही माहिती मागविण्यात आली होती.
त्यानुसार 94 अंमलदारांना शुक्रवारी सकाळी दहा वाजता पोलिस आयुक्तालयात हजर राहण्या सांगण्यात आले होते. त्यातील 81 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. साडे दहा वाजताच्या सुमारास पोलिस आयुक्त हॉलमध्ये आले. यावेळी प्रशासन विभागाचे अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया उपस्थित होते.