नवी दिल्ली – भाजप आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीला जोमाने लागला असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर लगेच लोकसभा निवडणूकीसाठी पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
17-18 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीत पक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 2021-22 मध्येच पक्षाने अशा लोकसभेच्या जागांची यादी तयार केली होती जिथे पक्षाची स्थिती फारशी मजबूत नाही. या यादीत अशा 160 जागांचा समावेश करण्यात आला आहे. जिथे पक्ष कधीच जिंकत नाही.
यामुळे आधीच भाजपने २०२४च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 17-18 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीत पक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची रणनीती पक्षातर्फे तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, पक्षाने निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित केले आहेत.
अधिवेशनानंतर पक्ष आपली पहिली यादी जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या संभाव्य मतदारसंघासाठी नवे चेहरे उतरवण्याची तयारी सुरू असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे. यामध्ये राहुल गांधी,अखिलेश यादव, कनिमोळी, अभिषेक बॅनर्जी, अधीर रंजन चौधरी आदींच्या विरोधात तीन संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे.
प्रथम दक्षिण भारतीय राज्यांतील उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. तेलंगणातील एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात फायरब्रँड नेते आणि महिला मोर्चाचे प्रवक्ते नदीमपल्ली यमुना पाठक यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. तर माजी क्रिकेटपटू एस. श्रीशांत तिरुअनंतपुरममधून शशी थरूर यांच्याविरुद्ध निवडणूक लढवू शकतात.
भाजपची पहिली यादी कुठे अडकली?
सूत्राने सांगितले की, पक्ष जानेवारीच्या अखेरीसच 62 उमेदवारांची यादी जाहीर करणार होता. परंतु जेडीयू, अकाली दल आणि राष्ट्रीय लोक दल एनडीएमध्ये परत येण्याच्या शक्यतेमुळे उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. बिहारमध्ये, नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीपासून वेगळे झाले आणि भाजपमध्ये परतले आणि 28 जानेवारी रोजी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचवेळी आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांनीही सोमवारी एनडीएमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे अकाली दलही एनडीएमध्ये सामील झाल्याची चर्चा आहे. यामुळेच भाजप लोकसभा निवडणूकीच्या तयारीला जोमाने लागला असल्याचे दिसून येते.