पुणे – मार्केट यार्ड येथे रविवारी (दि. 1) स्वछता मोहीम राबविण्यात आली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्वच्छता पंधरवडा देशभरात राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी विभाग, भारत सरकार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांचे संयुक्त विद्यमाने मार्केटयार्ड येथे मुख्य बाजार आवारातील फळे, भाजीपाला विभाग, फुलांचा बाजार, गुळ भुसार विभाग,
तसेच मांजरी, मोशी, खडकी, पिंपरी येथील उपबाजारामध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले. त्यामध्ये बाजार आवारातील आडते, व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलणार, कामगार व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रविंद्र कंद, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, संचालक गणेश घुले, अनिरूध्द भोसले, सुदर्शन चौधरी, संतोष नांगरे,
अच्युत गोरख सुरवसे, कृषी विभागाचे अधिकरी बाजार समितीचे सहसचिव शिवाजी गायकवाड, सहाय्यक सचिव बाळासाहेब तळेकर, फुल विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.