पुणे- शहरात सोमवारी तापमानाचा पारा चढला असून या महिन्यातील उच्चांकी 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, यावर्षातील दुसऱ्यांदा उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी 28 एप्रिल रोजी उच्चांकी 41.8 अंश सेल्सिअस नोंद झाली होती.
त्यानंतर राज्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडल्यामुळे तापमानात गारवा निर्माण झाला होता. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. 12 मे रोजी शहरात यावर्षातील सर्वांत कमी कमाल 33.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत पुन्हा सरासरी सात अंश सेल्सिअस तापमाणात वाढ झाली आहे. यामुळे शहरात दिवसा वर्दळ कमी होती.